महानुभाव पंथाची स्थापना- श्रीमद् सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांची प्रेरणादायी कथा Chakradhar Swami Mahanubhav Panth Information in Marathi
Chakradhar Swami Mahanubhav Panth Information in Marathi महानुभाव पंथाची स्थापना: श्रीमद् सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांची प्रेरणादायी कथा भरवस (भडोच) या शांत गावात विषाळदेव व मालनादेवी यांच्या घरी एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि तेजाचा लवकरच सर्वत्र बोलबाला झाला. या बालकाचे नाव ठेवले गेले हरिपाळदेव, आणि त्यांना लहानपणापासूनच राजघराण्याची प्रतिष्ठा लाभली होती. युवावस्थेतील दुःखद घटना Chakrapani-prabhu-haripaldev-deh-svikar Chakradhar Swami Mahanubhav Panth Information in Marathi हरिपाळदेवांचे आयुष्य त्यांच्या वीसाव्या वर्षी एका अकल्पित वळणावर आले. एका आख्यायिकेनुसार, वयाच्या वीसाव्या वर्षी त्यांचे अचानक निधन झाले. कुटुंब आणि गावात शोककळा पसरली, पण यावेळी फलटण येथील श्री चक्रपाणी प्रभूंनी त्यांच्या मृत शरीराचा स्वीकार केला आणि त्यांना पुन्हा जीवन दिले. मात्र, हा हरिपाळदेव आधीचा नव्हता; तो आता श्रीमद् सर्वज्ञ Chakradhar Swami झाले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अमूलाग्र बदल झाला होता. आता त्यांचे जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित नव्हते; त्यांचा हेतू होता समाजाला ...